फोटो अपलोड होत नाही? — सगळी कारणं आणि उपाय
फॉर्म पूर्ण भरून झाल्यावर शेवटच्या टप्प्यावर फाइल अपलोड होत नाही — हा सर्वात त्रासदायक क्षण असतो. कारण अनेक असू शकतात, आणि error संदेश बहुतेक वेळा नेमकं कारण सांगत नाही.
खाली सगळी कारणं क्रमाने दिली आहेत. वरून सुरुवात करा — पहिली तीन कारणं दहापैकी नऊ वेळा लागू पडतात.
1. फाइल मर्यादेपेक्षा मोठी आहे
सर्वात सामान्य कारण. मोबाईलचा फोटो 3,000 ते 8,000 KB चा असतो, पोर्टलला 20 KB हवे असतात.
उपाय — फाइल आधी योग्य पिक्सेल आकारात कापा, मग KB मर्यादेखाली आणा. फक्त compress करून उपयोग होत नाही.
2. चुकीचा format
Screenshot नेहमी PNG असतो. WhatsApp वरून आलेली फाइल कधी WEBP असते. बहुतेक सरकारी पोर्टल फक्त JPG स्वीकारतात, आणि सहीसाठी तर JPEG अनिवार्य आहे.
उपाय — फाइल JPG मध्ये बदला.
3. पिक्सेल आकार जुळत नाही
फाइल 15 KB असूनही "Invalid dimensions" असा संदेश येऊ शकतो. तो KB चा नाही, आकाराचा प्रश्न आहे.
| काय | आकार |
|---|---|
| आपले सरकार छायाचित्र | 160 × 200–212 |
| आपले सरकार सही | 256 × 64 |
4. फाइल खूप लहान आहे
हे बहुतेकांना माहीत नसतं. आपले सरकार वर किमान 5 KB ची अटही आहे. सही साधी असल्याने ती सहज 3-4 KB वर जाते आणि नाकारली जाते.
उपाय — लक्ष्य 15 ते 18 KB ठेवा, अगदी खाली नको.
5. फाइलच्या नावात अडचण
नावात मराठी अक्षरं, मोकळ्या जागा, किंवा विशेष चिन्हं असतील तर काही जुनी पोर्टल ती नाकारतात.
उपाय — नाव साधं इंग्रजीत ठेवा, उदाहरणार्थ photo.jpg किंवा sign.jpg.
6. Browser ची अडचण
काही सरकारी पोर्टल जुन्या तंत्रज्ञानावर चालतात आणि नव्या browser मध्ये अडतात.
उपाय — Chrome वापरा, आणि pop-up blocker तात्पुरता बंद करा. Incognito window मध्ये प्रयत्न करून बघा.
7. Session संपली
फॉर्म भरायला खूप वेळ लागला तर पोर्टलची session संपते. मग अपलोड बटण दाबूनही काहीच होत नाही, आणि कोणताही error संदेशही येत नाही.
उपाय — पुन्हा login करा. म्हणून फाइल आधी तयार करून ठेवा, फॉर्म भरताना बनवू नका.
8. पानांची संख्या जास्त
कागदपत्रांसाठी काही पोर्टल पानांची मर्यादाही ठेवतात.
उपाय — फक्त मागितलेली पानंच ठेवा. आठ पानी उतारा टाकण्याऐवजी संबंधित एकच पान काढा.
9. पोर्टलवरच अडचण
सकाळी दहा ते बारा या वेळेत सरकारी पोर्टल सर्वाधिक व्यस्त असतात.
उपाय — दुपारी किंवा रात्री प्रयत्न करा. सगळं बरोबर असूनही अपलोड होत नसेल तर हेच कारण असतं.
फाइल आधीच तयार ठेवा
सेतू किट मध्ये सेतू फोटो आणि सही ही दोन बटणं आहेत — एका क्लिकवर पिक्सेल आकार आणि KB मर्यादा दोन्ही जुळवली जातात. फॉर्म भरायला बसण्याआधी फाइल तयार करून ठेवा, म्हणजे session संपण्याचा धोका राहत नाही.
तुमची फाइल तुमच्याच device वर प्रोसेस होते — ती कोणत्याही सर्व्हरवर जात नाही.
टूल उघडा →तपासणीची क्रमवार यादी
अपलोड अडलं की हे क्रमाने तपासा:
- फाइल मर्यादेपेक्षा लहान आहे का
- फाइल किमान मर्यादेपेक्षा मोठी आहे का
- Format JPG आहे का
- पिक्सेल आकार जुळतोय का
- नाव साधं इंग्रजीत आहे का
- Session चालू आहे का
- दुसऱ्या वेळी प्रयत्न करून बघितला का
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Error संदेश येतच नाही, बटण दाबूनही काही होत नाही
बहुतेक वेळा session संपलेली असते. पुन्हा login करा. तसंच browser मध्ये pop-up अडवला जात असेल तर तोही तपासा.
एका पोर्टलवर चाललेली फाइल दुसऱ्या पोर्टलवर नाकारली जाते
प्रत्येक पोर्टलच्या अटी वेगळ्या असतात. एका ठिकाणी 100 KB चालतं, दुसरीकडे 20 KB. प्रत्येक अर्जाच्या पानावरची सूचना स्वतंत्रपणे वाचावी लागते.
फोटो अपलोड झाला पण नंतर अर्ज नाकारला गेला
हा वेगळा प्रश्न आहे. फाइल तांत्रिकदृष्ट्या बरोबर होती, पण फोटोचा दर्जा किंवा विषय अटींशी जुळला नाही. चेहरा स्पष्ट, समोरून, आणि साध्या पार्श्वभूमीवर असावा.