सेतू किट
मुखपृष्ठ › लेख

फोटो 20 KB कसा करायचा?

अद्ययावत — ऑगस्ट २०२६ · वाचायला ५ मिनिटं

सरकारी फॉर्म भरताना "फोटोचा आकार २० KB पेक्षा कमी असावा" अशी अट वारंवार येते. पण मोबाईलने काढलेला साधा फोटो ३,००० ते ८,००० KB चा असतो — म्हणजे मागितलेल्या आकाराच्या दीडशे ते चारशे पट.

तो २० KB खाली कसा आणायचा, आणि चेहरा धूसर न होता कसा ठेवायचा — हे इथे समजावून सांगितलं आहे.

२० KB ची अट कुठे येते

महाराष्ट्रातील बहुतांश सरकारी पोर्टलवर हीच मर्यादा आहे:

कुठेआकार (px)KBFormat
आपले सरकार — छायाचित्र160 × 200–2125 – 20 KBJPEG / PNG / TIFF
आपले सरकार — सही256 × 645 – 20 KBफक्त JPEG
किमान ५ KB ची अटही आहे — हे बहुतेकांना माहीत नसतं. फोटो जास्त compress करून ४ KB वर आणलात तर तोही नाकारला जाईल. फाइल ५ ते २० KB च्या मधे असावी लागते.

एक फोटो एवढा मोठा का असतो

आजच्या मोबाईलचा कॅमेरा १२ ते ५० मेगापिक्सेलचा असतो. म्हणजे एका फोटोत कोट्यवधी ठिपके साठवलेले असतात. सरकारी फॉर्मला मात्र फक्त १६० × २१२ ठिपके हवे असतात — म्हणजे मूळ फोटोच्या शंभराव्या भागाहूनही कमी.

म्हणून फाइल लहान करण्याचे दोन वेगळे मार्ग आहेत, आणि दोन्ही वापरावे लागतात:

फक्त compress केलं आणि resize केलं नाही, तर फोटो धूसर होतो पण KB फारसे कमी होत नाहीत. आधी resize, मग compress — हा योग्य क्रम आहे.

२० KB मध्ये आणण्याची पद्धत

  1. फोटो पांढऱ्या भिंतीसमोर, चांगल्या प्रकाशात, समोरून काढा.
  2. फोटो १६० × २१२ पिक्सेल मध्ये कापा. चेहरा मध्यभागी ठेवा.
  3. Format JPG ठेवा.
  4. लक्ष्य १७ ते १८ KB ठेवा — अगदी २० KB वर नको.
  5. तयार फाइल उघडून चेहरा स्पष्ट दिसतोय ना ते बघा.
१८ KB का, २० KB का नाही — काही पोर्टल फाइलचा आकार वेगळ्या पद्धतीने मोजतात. काठावर बसवलेली फाइल तिथे "मर्यादेपेक्षा मोठी" ठरू शकते. दोन-तीन KB ची मोकळीक ठेवणं सुरक्षित.

हे सगळं एका क्लिकमध्ये

सेतू किट मधलं सेतू फोटो बटण दाबा — फोटो आपोआप १६० × २१२ मध्ये कापला जातो आणि ५ ते २० KB च्या मधे आणला जातो. सहीसाठी वेगळं सही बटण आहे (२५६ × ६४).

तुमची फाइल तुमच्याच device वर प्रोसेस होते — ती कोणत्याही सर्व्हरवर जात नाही.

सेतू फोटो टूल उघडा →

चेहरा धूसर होऊ नये म्हणून

२० KB ही खरोखर लहान मर्यादा आहे. त्यात चेहरा स्पष्ट ठेवायचा असेल तर:

वारंवार होणाऱ्या चुका

PNG फाइल वापरणं

PNG प्रत्येक ठिपका जसाच्या तसा साठवतो, म्हणून फाइल मोठी राहते. JPG मध्ये बदला — तोच बहुतेक पोर्टलवर चालतो, आणि सहीसाठी तर तोच अनिवार्य आहे.

WhatsApp वरून आलेला फोटो वापरणं

WhatsApp आधीच फोटो compress करून पाठवतं. त्यावर पुन्हा compress केलं की दर्जा दुप्पट खराब होतो. मूळ फोटो वापरा, WhatsApp वरची प्रत नाही.

प्रमाण न सांभाळता ताणणं

आडवा फोटो जबरदस्तीने १६० × २१२ मध्ये बसवला तर चेहरा ताणला जातो. योग्य पद्धत म्हणजे फोटो कापणं, ताणणं नाही.

मूळ फोटो न ठेवणं

एकदा २० KB वर आणलेला फोटो पुन्हा मोठा करता येत नाही — गेलेला तपशील परत येत नाही. मूळ फोटो नेहमी वेगळा जपून ठेवा आणि त्याची प्रत compress करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

२० KB मध्ये फोटो नीट दिसेल का?

हो, जर तो आधी १६० × २१२ मध्ये कापला असेल तर. एवढ्या लहान आकारात २० KB पुरेसे असतात. अडचण तेव्हा येते जेव्हा मोठा फोटो resize न करता फक्त compress केला जातो.

Photoshop किंवा तत्सम सॉफ्टवेअर लागतं का?

नाही. सेतू किट सारखं ऑनलाइन टूल मोबाईलवरही चालतं आणि काहीही install करावं लागत नाही.

सही सुद्धा २० KB मध्ये लागते का?

हो, आपले सरकार वर सहीचीही मर्यादा ५ ते २० KB आहे. पण तिचा आकार वेगळा — २५६ × ६४ पिक्सेल, म्हणजे आडवा आयत. फोटोसारखा उभा नाही.

५० KB किंवा १०० KB मागितले तर?

तीच पद्धत — फक्त लक्ष्य बदला. मर्यादेच्या २-३ KB खाली थांबा.